adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गणेशोत्सवाची चाहूल; गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकारांची लगबग शाडू मातीच्या मूर्तींना यंदाही पसंती; विविध आकर्षक रूपातील मूर्तींनी घेतले आकार

गणेशोत्सवाची चाहूल; गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकारांची लगबग शाडू मातीच्या मूर्तींना यंदाही पसंती; विविध आकर्षक रूपातील मूर्ती...

गणेशोत्सवाची चाहूल; गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकारांची लगबग

शाडू मातीच्या मूर्तींना यंदाही पसंती; विविध आकर्षक रूपातील मूर्तींनी घेतले आकार
चोपडा येथे गणेशमूर्तीला अंतिम रूप देताना मूर्तिकार अनिलराज पाटील.

विश्राम तेले चौगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 चोपडा : गणेशोत्सवाचे दिवस जवळ येताच परिसरातील गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांच्या कामाला वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मूर्ती घडविण्याच्या कामाला आता अंतिम टप्पा आला असून, रंगकाम, नक्षीकाम आणि मूर्तीला आकर्षक रूप देण्याची लगबग सुरू झाली आहे.

गणेशमूर्तींच्या मागणीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढ होण्याची शक्यता असून, विविध गणेश मंडळांकडून आपल्या पसंतीच्या मूर्ती निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत वाढत असलेल्या जनजागृतीमुळे शाडू मातीपासून तयार होणाऱ्या मूर्तींना विशेष महत्त्व मिळत आहे. मात्र, यंदा शाडू मातीच्या दरात सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा परिणाम मूर्तींच्या अंतिम किमतीवर होण्याची शक्यता आहे.

चोपडा शहरातील मूर्तिकार अनिलराज पाटील यांच्या कार्यशाळेत विविध प्रकारच्या गणेशमूर्ती आकार घेत असून, सध्या त्यावर रंगसंगती व सजावटीचे बारकावे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. पद्मासनातील गणेशमूर्ती तसेच अष्टविनायकांच्या प्रतिकृती त्यांनी साकारल्या असून, आकर्षक रंगसंगतीमुळे या मूर्ती लक्षवेधी ठरत आहेत.

मूर्ती तयार करताना तिचे स्वरूप, भावमुद्रा, रंगसंगती आणि सजावट याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. गणेशोत्सव मंडळे आणि भाविकांना आकर्षक तसेच पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी मूर्तिकारांची मेहनत अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीमुळे शहरासह ग्रामीण भागातील वातावरणातही उत्साह निर्माण झाला असून, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांकडून उत्सवाच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत गणेशमूर्तींची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होणार असल्याने मूर्तिकारांची धावपळ आणखी वाढणार आहे.

No comments