ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा राज्य अभ्यासवर्ग ८ आणि ९ ऑगस्टला वडगाव मावळ येथे! राज्यभरातील ४५० हून अधिक ग्राहक कार्यकर्ते सहभागी होणार – डॉ...
ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा राज्य अभ्यासवर्ग ८ आणि ९ ऑगस्टला वडगाव मावळ येथे!
राज्यभरातील ४५० हून अधिक ग्राहक कार्यकर्ते सहभागी होणार – डॉ. विजय लाड
नाशिक प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
ग्राहक देवो भव आणि ग्राहक : एव राजा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ग्राहकांचे हक्क, कर्तव्ये आणि ग्राहक संरक्षण कायद्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक जनजागृती करणाऱ्या अधिष्ठानप्राप्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संघटनेचे दोन दिवसीय भव्य राज्य अधिवेशन व राज्यस्तरीय अभ्यासवर्ग २०२६ येत्या शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट व रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी शिवराज पॅलेस, वडगाव मावळ, मुंबई-पुणे हायवे, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
“ग्राहक देवो भव” हे ब्रीद साकारून ग्राहक हा राजाच आहे हे समजून राज्यस्तरीय अभ्यास वर्ग आयोजित केला आहे. या राज्य अधिवेशनासाठी राज्यभरातील ४५० हून अधिक ग्राहक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यासाठी साधकांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी केली असल्याची माहिती राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी दिली.
या दोन दिवसीय राज्य अधिवेशनाचे उद्घाटन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मा.न्यायमूर्ती श्री. सुरेंद्र तावडे यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष डॉ. विजयजी लाड राहणार आहेत.
या अधिवेशनात विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री. सुनिल आण्णा शेळके, माजी राज्यमंत्री श्री. संजय उर्फ बाळा भेगडे, माजी सहकार मंत्री आमदार श्री. सुभाषबापू देशमुख, माजी अर्थमंत्री आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, महावितरणचे मानव संसाधन संचालक श्री. राजेंद्र पवार, उद्योजक कॅप्टन विलासराव कात्रे या सर्वांचे विशेष मार्गदर्शन व उपस्थिती लाभणार आहे.
या अगोदरही राज्यातील विविध विभागात राज्यस्तरीय अधिवेशन झाल्याने साधक पदाधिकाऱ्यांना मोठी ऊर्जा मिळते. या अधिवेशनात राज्यभरातून ग्राहक हितार्थ व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यात रामराव जगदाळे यांना समाजभूषण पुरस्कार, अर्थव्यवस्थेचे पंचप्राण राज्यस्तरीय पुरस्कार अंतर्गत श्रमिक क्षेत्रात श्री. विठोबा लच्छिराम ध्यानध्यान, नाशिक, व्यापारी क्षेत्रात श्रीमती सुविधी सुधीर जयस्वाल, नागपूर , शेतकरी क्षेत्रात पांडुरंग कुंडलिक बरळ पुणे, उद्योजक क्षेत्रात रयत आरोग्य मंडळ नांदेड, ग्राहक क्षेत्रात सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग कोकण, तसेच विभागीय उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार श्री. नितीन मुकेवार नागपूर विभाग, श्री. उदय अग्निहोत्री नाशिक विभाग, श्री. विष्णुप्रसाद दळवी, कोकण विभाग, प्रा. रावसाहेब तानाजी गर्जे, छ.संभाजीनगर विभाग, श्री.रवींद्र विठ्ठलराव ठाकरे, अमरावती विभाग, श्री. बाळासाहेब चव्हाण, पुणे विभाग या साधकांना त्यांच्या कार्य गौरवार्थ प्रदान केले जाणार आहेत. असे राज्य महासचि्व श्री. अरुण वाघमारे यांनी म्हटले आहे.
दोन दिवसीय सत्रांची विस्तृत रूपरेषा: शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता नावनोंदणीने कार्यक्रमाला सुरुवात होईल. दुपारी ३ वाजता उद्घाटन सत्र, स्वागत, ग्राहक गीत, दीप प्रज्वलन, प्रास्ताविक (राज्य सचिव श्री. अरुण वाघमारे), सत्कार, राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व उद्घाटकीय भाषण होईल. सायंकाळी ५:३० वाजता अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त यांचे मार्गदर्शन, सायंकाळी ६:०५ वाजता शेतकरी ग्राहक प्रबोधन सत्र - श्री. सर्जेराव जाधव, सायं. ६:४० वाजता प्रवासी ग्राहक सत्र, सायं. ७:१५ वाजता सर्व जिल्ह्यांचा अहवाल आणि रात्री ८:३० वाजता संस्थापक ग्राहकतीर्थ स्वर्गीय बिंदुमाधव जोशी यांच्या जीवनावरील विशेष ध्वनीचित्रफित दाखवण्यात येईल.
रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ ते ७:३५ चिंतन सत्र, सकाळी ७:३५ वाजता संस्थेची त्रिसूत्री व कार्यपद्धती -श्री. एस. एन. पाटील, सकाळी ८:१० वाजता ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच -श्री. महेंद्र दिवाकर, सकाळी ९:१५ वाजता सजग विद्यार्थी ग्राहक अभियान – राज्य सहसंघटक सौ. मेधाताई कुलकर्णी, सकाळी ९:५० वाजता कार्यकर्ता कसा असावा – राज्य सदस्य प्रा. चंद्रकांत डागा, सकाळी १०:२५ वाजता मुंबई नर्सिंग कायदा - डॉ. ज्ञानचंद्र पाटील, सकाळी ११ वाजता सायबर क्राईम - श्री. योगेश ठाणगे, सकाळी ११:४५ वाजता अमृतयोजना आणि ग्राहक चळवळ - श्री. विजय बिंदुमाधव जोशी व दुपारी १२:२० वाजता ग्राहक संरक्षण परिषद व आयोग - श्री. शामकांत पात्रीकर यांची व्याख्याने होतील. दुपारी २ वाजता राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाचा मुख्य समारोप होईल.
यामध्ये नाशिक विभागाने मारलेली बाजी विशेष कौतुकास्पद ठरली आहे. श्रमिक क्षेत्रातील अर्थव्यवस्थेचे पंचप्राण राज्यस्तरीय पुरस्कार नाशिकचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. विठोबा लच्छाराम ध्यानदास यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच नाशिक विभाग राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार नाशिक विभागाचे ज्येष्ठ व अभ्यासू कार्यकर्ते श्री. उदय अग्निहोत्री यांना प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या अभ्यास वर्गासाठी नाशिक जिल्ह्यातून ३७ साधक, अहिल्यानगर जिल्ह्यातून ३५ साधक, धुळे जिल्ह्यातून ३२ साधक, जळगाव जिल्ह्यातून ३० साधक आणि नंदुरबार जिल्ह्यातून २१ साधक असे नाशिक विभागातील एकूण १५५ साधक व पदाधिकारी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या अभ्यासवर्गासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक विभाग सचिव ॲड. सुरेंद्र सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या राज्य अधिवेशनात नाशिक विभागाचा सहभाग यशस्वी करण्यासाठी नाशिक विभाग अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे, विभाग सचिव ॲड. सुरेंद्र सोनवणे व नाशिक विभाग संघटक श्री. संजय शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉ. संजय पाटील, सचिव सुरेशचंद्र धारणकर, संघटक डॉ. राजेंद्र बागुल; अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष श्री. गजेंद्र क्षीरसागर, सचिव ॲड. सिद्धार्थ वाघमारे; धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. बापूसाहेब जे. टी. देसले, सचिव श्री. शशिकांत पाटील, संघटक प्रा. चंद्रकांत डागा; जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. गुरुबक्ष जाधवांनी, सचिव डॉ. नितीन धांडे; नंदुरबार जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. संजयकुमार शर्मा, सचिव श्री. अशोक सूर्यवंशी, संघटक श्री. उदय निकुंभ यासह प्रमुख पदाधिकारी सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी अहोरात्र परिश्रम घेत आहे.

No comments