adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धान्य दुकानदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - आमदार हेमंत ओगले धान्याच्या लाभार्थींची संख्या वाढवा - नगराध्यक्ष करण ससाणे, श्रीरामपूर येथे बैठक संपन्न

धान्य दुकानदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - आमदार हेमंत ओगले धान्याच्या लाभार्थींची संख्या वाढवा - नगराध्यक्ष करण ससाणे, श्रीर...

धान्य दुकानदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - आमदार हेमंत ओगले

धान्याच्या लाभार्थींची संख्या वाढवा - नगराध्यक्ष करण ससाणे, श्रीरामपूर येथे बैठक संपन्न


चंद्रकांत झरंगे / भोकर

(संपादक : हेमकांत गायकवाड)


श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांबरोबरच जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न शासन दरबारी मांडून प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार त्याच बरोबर जास्त उत्पन्न गटातील अनेक कुटूंबांना अन्न सुरक्षा व अन्त्योदय योजनेचा लाभ बंद केला त्या ठिकाणी त्वरीत नवीन लाभार्थींची निवड करून त्यांना धान्याचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्याचे पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांची भेट घेवून जास्तीत जास्त लाभार्थींना धान्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहीती श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी दिली.

श्रीरामपूर शहर व तालुक्यातील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारांची नुकतीच श्रीरामपूर नगर परिषद कार्यालय सभागृहात बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष करण ससाणे हे होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष आण्णासाहेब डावखर, धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रज्जाकखान पठाण, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक दशरथ पिसे, चंद्रकांत झुरंगे, शहराध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सुभाष चोरडीया, प्रकाश गदीया, शिवाजी सैद, बाळासाहेब राठोड, चंद्रकांत गायकवाड, माणीकराव जाधव आदि प्रमुख उपस्थितीत होते. 

श्रीरामपूर तालुक्याच्या परिसरातील हरेगांव शुगर मिल्स, टिळकनगर शुगर मिल्स व सुतगीरणी आदि प्रकल्प बंद पडल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेराजगारी असल्याने गरीबांची संख्या ही वाढली आहे, परंतू त्यातील अनेक कुटूंब सरकारच्या मोफत धान्य योजनेपासून वंचीत आहेत, त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांची भेट घेवून लाभार्थी संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच दुकानदारांच्या ही वेगवेगळ्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार हेमंत ओगले व नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगीतले.

धान्याच्या लाभार्थीमधून जास्त उत्पन्न असणार्‍या कुटूंबांचा धान्याचा लाभ बंद झाल्याने लाभार्थी संख्या घटल्याने धान्य दुकानदारांचे मार्जीन मध्ये घट झालेली असल्याने रिक्त जागेवर नवीन लाभार्थींची तातडीने निवड करावी, धान्य दुकानदारांनी मे २०२१ व नोव्हेंबर २०२२ या दोन महिन्यात धान्याचे चलनाने पैसे भरून अचानक आलेल्या शासनाच्या आदेशानुसार ते धान्य दुकानदारांनी मोफत वाटप केले परंतू अद्यापर्यंत ते चलनाने भरलेले पैसे दुकानदारांना परत मिळालेले नाहीत. तसेच कोविड मध्ये दुकानदारांनी मोफत धान्य वितरण केले परंतू महिना संपल्यानंतर पुढील महिन्यात आलेल्या धान्याला सरकारने कॅरीफॉरवर्ड म्हणून संबोधीत करत त्या वितरणाचे दुकानदारांना मार्जीन दिलेले नाही ते मिळावे, शहरात थेट वाहतुक योजनेतील धान्य रिकाम्या गोणीचे वजन वजा करून पुर्ण वजनाचे धान्य मिळावे, अनेकदा गोदामातून दुकानात धान्य पोहच करताना वाहनात धान्य सांडते व ते मिक्स होते तसेच वितरण करताना ही सांडलवंड होते, त्यामुळे दुकानदारांना पुर्वी प्रमाणे प्रतिक्विंटल ला एक किलो घट मंजूर व्हावी आदि मागण्या जिल्हा कार्याध्यक्ष रज्जाकखानप पठाण, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक दशरथ पिसे व प्रकाश गदीया यांनी मांडल्या.

यावेळी राजेंद्र वाघ, वासुदेव वधवाणी, अनिल मानधना, योगेश नागले, विकी धाकतोडे, सुखदेव वाघ, धनंजय झिरंगे, अनिल ठाकरे, किरण मुठे, विकी काळे,विकी पारखे आदिंसह मोठ्या संख्यने दुकानदार उपस्थित होते.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments