adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण

 अंतुर्ली येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण  अंतुर्ली / मुक्ताईनगर – किरण धायले : (संपादक -:- ...

 अंतुर्ली येथे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण 


अंतुर्ली / मुक्ताईनगर – किरण धायले :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)


अंतुर्ली येथे ८० वा स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयासह ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, आरोग्य केंद्र तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय, अंतुर्ली येथे अंतुर्ली पोलीस आऊट पोस्टचे जमादार पवनदादा सपकाळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.

त्यानंतर अंतुर्ली ग्रामपंचायत येथे मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रशासक, ग्रामपंचायत कमिटी अंतुर्ली सौ. सुलभाताई शिरतुरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर, महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, विविध शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गावातील गायत्री पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायटी, पीक संरक्षण सोसायटी, जिल्हा परिषद मराठी शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, मी. फ. तराळ विद्यालय व एम. आर. महाजन ज्युनिअर कॉलेज, तापीमाई दूध उत्पादक सोसायटी, कुसुमताई इंग्लिश मीडियम स्कूल, प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुर्ली, महावितरण सब स्टेशन अंतुर्ली तसेच इतर विविध ठिकाणीही स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संपूर्ण अंतुर्ली गावात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

No comments