adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सौ. तु. ल. कोळंबे शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  सौ. तु. ल. कोळंबे शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) 15 ऑगस्ट  शनिवार रोजी  को...

 सौ. तु. ल. कोळंबे शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

15 ऑगस्ट  शनिवार रोजी  कोळंबे शाळेचे स्कूल कमिटी अध्यक्ष श्री पुरुषोत्तम निवृत्ती महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यावर तंबाखूमुक्त शपथ ,नशामुक्ती शपथ ,निपुण शपथ, साक्षरता शपथ घेण्यात आली. मुलांनी सुंदर संगीतमय कवायत सादर केली. शाळेत  गीत गायन स्पर्धा तसेच वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. पालक प्रतिनिधी  महिला व पुरुष यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती प्रणिता चौधरी मॅडम यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी च्या चेअरमन ॲड रोहिणी ताई खडसे .व्हाईस चेअरमन नारायण चौधरी .स्कूल कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम महाजन .सचिव डॉक्टर सी. एस. चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले. कार्यक्रम आनंददायी  वातावरणात पार पडला.

No comments