गलंगी शिवारात विषमुक्त केळी पिकाची शिवारफेरी अशोक कोळी चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गलंगी शिवारात १०० टक्के विषमुक्त शेती पद्धतीन...
गलंगी शिवारात विषमुक्त केळी पिकाची शिवारफेरी
अशोक कोळी चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गलंगी शिवारात १०० टक्के विषमुक्त शेती पद्धतीने संगोपन करण्यात आलेल्या केळी पिकाची शिवारफेरी व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मौजे गलंगी शिवारातील गणपूर रोडलगत साई इंग्लिश स्कूलजवळील सर्वे क्रमांक १२ व १५ मध्ये सुमारे चार एकर क्षेत्रावर या केळी पिकाची लागवड करण्यात आली आहे.
श्री. माधव देवराज, सेवानिवृत्त कृषी सहाय्यक अधिकारी यांनी श्री. माऊली कापसे यांच्या आधुनिक व प्राचीन कृषी तंत्रज्ञानाचा ताळमेळ साधून कमी खर्चात, विषमुक्त व निर्यातक्षम शेती कशी करावी, या संकल्पनेतून ऑनलाइन प्रशिक्षण घेतले आहे. दोन ऑनलाइन प्रशिक्षणांनंतर त्यांनी या पद्धतीने केळी पिकाचे संगोपन केले आहे.
या क्षेत्रात २५ ऑक्टोबर २०२५ रोजी केळीच्या टिश्यू रोपांची लागवड करण्यात आली. पिकाच्या निकोप वाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध निविष्ठा स्थानिक परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक घटकांपासून घरच्या घरी तयार करून वापरण्यात आल्या आहेत. सध्या हे केळी पीक वाढ, निसवण, पोषण व पक्वता अशा विविध अवस्थांमध्ये आहे.
शेतकऱ्यांनी कमी खर्चात स्वतःच्या घरी नैसर्गिक पद्धतीने शेतीसाठी आवश्यक निविष्ठा कशा तयार कराव्यात, तसेच विषमुक्त व निर्यातक्षम शेती कशी करावी, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळावे, हा या शिवारफेरीचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमासाठी श्री. माऊली कापसे स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. व त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखा आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रम दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. शेतकरी बांधवांनी कुटुंबासह वेळात वेळ काढून वेळेवर उपस्थित राहून यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थळ : मौजे गलंगी, गणपूर रोडलगत, साई इंग्लिश स्कूलजवळ, ता. चोपडा, जि. जळगाव.

No comments