adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर येथील पी. एम. श्री शाळेत स्पेलिंग बी. स्पर्धेचे आयोजन

 रावेर येथील पी. एम. श्री शाळेत स्पेलिंग बी. स्पर्धेचे आयोजन  मुबारक तडवी रावेर/ इदू पिंजारी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर येथील  दि. ...

 रावेर येथील पी. एम. श्री शाळेत स्पेलिंग बी. स्पर्धेचे आयोजन


 मुबारक तडवी रावेर/ इदू पिंजारी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर येथील  दि. 25/08/2026 पीएम श्री जि. प. उर्दू शाळा, रावेर येथे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शब्दलेखन कौशल्याला चालना देण्यासाठी ‘Spelling Bee’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध इंग्रजी शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्र प्रमुख अहमद सर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक  अब्दुल सलाम सर होते विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार विविध शब्द देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व अचूकपणे शब्दांचे स्पेलिंग सांगून आपल्या भाषिक कौशल्याचे प्रदर्शन केले. 


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल आवड, आत्मविश्वास, शब्दसंपदा आणि अचूक उच्चार व लेखनाची सवय विकसित होण्यास मदत झाली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  शाळास्तरावर गटनिहाय विद्यार्थ्यांची  केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी  निवड करण्यात आली आहे

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  प्रभारी मुख्याध्यापक रईस सर व सहकारी शिक्षक युनुस सर अजीज सर विकार सर मुख्तार सर गुलरेज सर अजहर सर इरफान सर नावेद सर विषेश शिक्षक नितीन सर अंशकालीन शिक्षक कयाम सर अजहर सर यांनीपरिश्रम घेतले.

No comments