adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नारायण हाईट्समध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

 नारायण हाईट्समध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वसई : वसई तालुक्यातील यशवंत गौरव चौक ...

 नारायण हाईट्समध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वसई : वसई तालुक्यातील यशवंत गौरव चौक येथील रस्त्यालगत असलेल्या नारायण हाईट्स या इमारतीमध्ये १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी इमारतीमधील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. 


कार्यक्रमाच्या निमित्ताने इमारतीच्या परिसरात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा आनंद घेतला.नारायण हाईट्समधील लहान मुलांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तिरंगा ध्वज, देशभक्तीपर घोषवाक्ये आणि आनंदाचे वातावरण यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह निर्माण झाला होता. नागरिकांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत हा राष्ट्रीय सण आनंदाने साजरा केला.नारायण हाईट्समधील नागरिकांच्या एकत्रित सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम उत्साह, देशप्रेम आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा ठरला.

No comments