जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजींच्या समाधी चे दर्शन रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गा...
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजींच्या समाधी चे दर्शन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये आदिवासी दुर्गम भागातील पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रमाचे संस्थापक सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीच्या 58 वे अवतरण दिवस दि 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आले. त्यावेळी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पाल आश्रमात स्थित परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे समाधी चे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या सोबत उप वन संरक्षक अधिकारी सौरीश सहाय,यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, प्रभारी तहसीलदार संजय तायडे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे,जेष्ठ पत्रकार दीपक नगरे,संत श्री श्याम चैतन्य जी महाराज, श्री लखन महाराज, ऋषी चैतन्य महाराज, उत्तमपवार, अनारसिंगचव्हाण, रघुनाथ चव्हाण,
धनराज पवार,दशरथ पवार, हरी चव्हाण,पिंटू पवार, संजय पवार, सुरेश पवार, पूनमचंद जाधव, विकास चव्हाण,नंदकिशोर चव्हाण, गणेश भोई, छोटूलाल चव्हाण, दिलीप जाधव, मनोहर चव्हाण, प्रकाश पवार, दिनेश चव्हाण, सुनील राठोड, शीतल बुनकर, काळू पवार,राधेश्याम चव्हाण, नवीन पवार,तलाठी सलीम तडवी, कोतवाल अमीन तडवी,आदी उपस्थित होते.
परम पूज्य बापूजीच्या अवतरण दिनानिमित्त पाल वृंदावन धाम येथून त्याच्या भक्तीसभेचे आयोजन करुन रावेर तालुका भक्तीफेरी काढण्यात आली. तसेच आश्रमात ध्यान, प्रार्थना, व गीतेचे पठन करुन विद्यमान पदस्थ श्रद्येय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असलेले संत श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी आपल्या सत्संगात पूज्य बापूंजीचे जीवन चरित्र व त्यांनी दिलेल्या शिकवणी साधकांना आठवण करुन दिली तसेच निर्व्यसनी जीवन जगण्याचे संदेश दिला शेवटी आरती करुन पाल चे चव्हाण परिवारातर्फे महाप्रसाद वितरण करण्यात आले.

No comments