विकास विद्यालयाचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण, शाळेतून खुशाल पाटील पहिला गणपुर (ता चोपडा) उतीर्ण विद्यार्थ्यांसह शिक्षक व...
विकास विद्यालयाचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण, शाळेतून खुशाल पाटील पहिला 
गणपुर (ता चोपडा) उतीर्ण विद्यार्थ्यांसह
शिक्षक व शिक्षिका
विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गणपूर(ता चोपडा) ता 29: येथील विकास माध्यमिक विद्यालयातील सातवी नंतरच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या दहापैकी दहा ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतून शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या दहा विद्यार्थ्यांमधून खुशाल पाटील हा पहिला आला असून त्याला 236 गुण मिळालेले आहेत. त्याच्यासह अयान पिंजारी, अनुष्का पाटील, योगराज पाटील, भूमिका पाटील,शुभांगी वानखेडे, तनय पाटील, यामिनी पाटील,सुवर्णा वानखेडे व रितिका पाटील हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले व शिष्यवृत्तीस पात्र ठरले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ए व्ही पाटील, पर्यवेक्षक जे आर इंगळे, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन व कौतुक केले .....
No comments