फैजपूरच्या देवीवाडा प्रभागात एकल महिलांच्या सर्वेक्षण नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता व अविवाहित महिलांसाठी विशेष...
फैजपूरच्या देवीवाडा प्रभागात एकल महिलांच्या सर्वेक्षण नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता व अविवाहित महिलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन
फैजपूर : — इदू पिंजारी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरातील देवीवाडा परिसरातील बहुउद्देशीय सभागृहात दि. २९ व ३० ऑगस्ट रोजी प्रभाग क्रमांक ४ व ५ तसेच शहरातील पात्र एकल महिलांसाठी सर्वेक्षण नोंदणी व अर्ज स्वीकृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता तसेच अविवाहित महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. पात्र महिला लाभार्थींचे आवश्यक फॉर्म भरून घेण्यात आले तसेच अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या माध्यमातून संबंधित महिलांची नोंदणी करून त्यांना उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माहिती संकलित करण्यात आली.
यावेळी फैजपूरचे उपनगराध्यक्ष विनोद (पप्पू) चौधरी, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक केतन किरंगे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. दिपाली जितेंद्र भारंबे, नगरसेविका सौ. नीलिमा राजेश महाजन, राजेश महाजन सर, महिला बचत गट समूह संघटक प्रमुख सौ. विद्या सरोदे तसेच बाह्य यंत्रणेचे कर्मचारी राकेश कोल्हे उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी भूषण भिरुड, सचिन साळी, जयप्रकाश चौधरी आदींनी परिश्रम घेतले. या अर्ज स्वीकृती व सर्वेक्षण शिबिराचा परिसरातील असंख्य महिलांनी लाभ घेतला असून, पात्र महिलांनी मोठ्या संख्येने नोंदणी केल्याची माहिती प्रभागातील नगरसेवकांनी दिली.

No comments