महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल सेवक पुरस्काराने श्री. जितेंद्र चौधरी यांचा गौरव चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महसूल दिनान...
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल सेवक पुरस्काराने श्री. जितेंद्र चौधरी यांचा गौरव
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने सन २०२५–२६ मधील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत तहसील कार्यालय, चोपडा अंतर्गत हातेड खुर्द येथील महसूल सेवक श्री. जितेंद्र पुंडलिक चौधरी यांना "उत्कृष्ट महसूल सेवक" या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महसूल प्रशासनातील कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, लोकाभिमुख व उल्लेखनीय सेवेमुळे श्री. चौधरी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित महसूल दिनाच्या भव्य कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते श्री. जितेंद्र चौधरी यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार राजू मामा भोळे, विधान परिषद आमदार नंदकिशोर महाजन, जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.), अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, जळगाव महानगरपालिका आयुक्त, तसेच महसूल विभागातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदान करण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रावर जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.) तसेच अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उत्कृष्ट महसूल सेवक म्हणून मिळालेला हा सन्मान श्री. चौधरी यांच्या कार्याचा गौरव असून, त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेप्रती असलेल्या समर्पणाची अधिकृत दखल असल्याचे मानले जात आहे.
या उल्लेखनीय यशामुळे तहसील कार्यालय, चोपडा, हातेड परिसर तसेच संपूर्ण महसूल विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून श्री. जितेंद्र चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


No comments