गि. द. महाजन कनिष्ठ महाविद्यालयात मनविसेच्या सदस्य नोंदणीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जामनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकव...
गि. द. महाजन कनिष्ठ महाविद्यालयात मनविसेच्या सदस्य नोंदणीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जामनेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जामनेर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य नोंदणी अभियान १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात सुरू असून, या अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत गि. द. महाजन कनिष्ठ महाविद्यालय, जामनेर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सदस्य नोंदणी केंद्र उभारण्यात आले. या केंद्रावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनविसेची सदस्य नोंदणी करून घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडणे तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे लढा देणे, हा सदस्य नोंदणी अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी मनसे जामनेर तालुकाध्यक्ष अशोक भाऊ पाटील, मनविसे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, मनविसे जिल्हा सचिव विष्णू कोळी, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आशुतोष पाटील, मनविसे जामनेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, मनविसे चोपडा तालुका उपाध्यक्ष नितीन कोळी, वैभव चौधरी, योगेश कोळी यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. “विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, शिक्षणाशी निगडित प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवण्यासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य व्हा!” असे आवाहन यावेळी करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला जामनेर तालुक्यात विद्यार्थ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता आगामी काळात हे अभियान अधिक व्यापक करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

No comments