adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

परंपरेला नवा विचार, तेरवीचा खर्च शाळेच्या हितासाठी; तायडे परिवाराचा समाजोपयोगी संकल्प

 परंपरेला नवा विचार, तेरवीचा खर्च शाळेच्या हितासाठी; तायडे परिवाराचा समाजोपयोगी संकल्प अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मल...

 परंपरेला नवा विचार, तेरवीचा खर्च शाळेच्या हितासाठी; तायडे परिवाराचा समाजोपयोगी संकल्प

अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर : आजीच्या तेरवीचा उहापोह न करता तेरवीच्या कार्यक्रमाला होणारा खर्च गावातील शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शुध्द व थंड पाणी  वितरीत करणारी पाण्याची टाकी व पाणी शुध्दीकरण प्लांट देवून वरखेड येथील तायडे परिवाराने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

वरखेड येथील माजी सरपंच निवृत्ती तायडे यांच्या आई व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, इंजि.सचिन तायडे यांच्या आजी प्रभावतीबाई तायडे यांचे ३१ जुलै रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले होते. तायडे परिवार मराठा सेवा संघाच्या विचारसरणीचा असून बहुजनांच्या मुलांनीही शिकून मोठे व्हावे या सेवासंघाच्या विचारातून प्रेरीत होत त्यांनी आपल्या आजीचा तेरवीचा कार्यक्रम हा परंपरेनुसार विधीवत फक्त भावबंदकीत करीत मोठे स्वरूप न  देता साधेपणाने करून गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी टाकी उभारून त्यातून फिल्टर झालेले शुध्द व थंड पाण्याचे फिल्टर प्लॅन्ट भेट देत आजीच्या स्मृती कायम जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

१२ ऑगस्ट रोजी प्रभावतीबाईच्या तेरवीच्या दिवशीच वरखेड येथील शाळेत प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार असून बांधकाम पुर्ण झाल्यानंतर शाळा व अंगणवाडीला शुध्द पाण्याची टाकी व आरओ फिल्टर व चिलर प्लॅंट तायडे परिवाराच्या वतीने समर्पित करण्यात येणार आहे.

चौकट 

माझे वडील व माझें सुद्धा प्राथमिक शिक्षण

वरखेड येथील जिल्हा परिषद शाळेतच

झाले आहे. कायम शिक्षणाप्रती जागृत

असणाऱ्या माझ्या आजीच्या तेरवी 

निमित्त या शाळेला टाकी, फिल्टर व चिलर प्लॅन्ट देण्याचा

योग आमच्या हातून घडत आहे, हे मी

भाग्यच समजतो.

– इंजि. सचिन निवृत्ती तायडे

रा वरखेड ता.मलकापूर

No comments