निष्ठावंत शिक्षक कार्यकर्त्याला संधी द्या! अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. सुमित पवार यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून जोरदार म...
निष्ठावंत शिक्षक कार्यकर्त्याला संधी द्या!
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. सुमित पवार यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून जोरदार मागणी ..
आगामी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी विविध इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाशी निष्ठेने जोडलेले, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले आणि संघटनात्मक बांधणीचा अनुभव असलेले डॉ. सुमित सुरेशराव पवार यांचे नाव सध्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेत आले आहे. “पक्षाच्या अडचणीच्या काळात तळागाळात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी,” अशी भावना भाजपच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून, शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. पवार यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी पुढे येत आहे.
शिक्षक संघटन आणि पक्षकार्याचा दुहेरी अनुभव
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या विस्तीर्ण मतदारसंघात शिक्षकांचे प्रश्न, संघटनात्मक संपर्क आणि स्थानिक पातळीवरील मजबूत नेटवर्क हे उमेदवाराच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक मानले जातात. डॉ. सुमित पवार यांनी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शिक्षक संघटन उभारणीसाठी काम केले आहे. विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षकांशी संपर्क वाढवत त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, निवेदने तसेच विविध संघटनात्मक उपक्रम राबविल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अमरावती विभागाचे विभाग कार्यवाह म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक संघटनात्मक क्षेत्रातील अनुभव आणि व्यापक शिक्षक संपर्क ही त्यांच्या उमेदवारीची जमेची बाजू असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.
भाजपच्या संघटनात्मक कार्यातही सक्रिय
डॉ. पवार हे भाजपच्या संघटनात्मक कार्यातही सक्रिय असून, भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीणचे जिल्हा सरचिटणीस म्हणून पक्षाची संघटनात्मक जबाबदारी सांभाळत आहेत. ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक घटकांशी सातत्याने संपर्क ठेवत पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले असल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येते. एकीकडे शिक्षक संघटनात्मक क्षेत्रातील व्यापक संपर्क आणि दुसरीकडे भाजपच्या संघटनात्मक कार्यातील सक्रिय सहभाग, या दोन्ही बाबी त्यांच्या उमेदवारीच्या दाव्याला बळ देणाऱ्या ठरत आहेत.
भाजप-शिक्षक परिषद समन्वयाकडे लक्ष
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची दीर्घकाळ संघटनात्मक भूमिका राहिली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिक्षक परिषद यांच्यात समन्वय साधण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांमध्ये प्रत्यक्ष संपर्क असलेला, संघटन उभारणीचा अनुभव असलेला आणि पक्षाशी दीर्घकाळ निष्ठेने जोडलेला उमेदवार देण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. याच निकषांवर डॉ. सुमित पवार यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी मागणी समर्थकांकडून केली जात आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असली तरी, “पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे,” असा सूर काही कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
डॉ. पवार यांच्या समर्थकांच्या मते, शिक्षकांमधील संपर्क, संघटनात्मक कामाचा अनुभव, पक्षातील जबाबदारी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी असलेला संवाद या बाबी त्यांना इतर इच्छुकांच्या तुलनेत वेगळी ओळख देतात.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नसला तरी इच्छुकांच्या नावांवर पक्षपातळीवर चर्चा सुरू आहे. उमेदवार निवडताना पक्षनिष्ठा, शिक्षकांमधील जनसंपर्क, संघटनात्मक क्षमता, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. सुमित पवार यांच्या नावाची वाढती चर्चा राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहे. आता भाजपचे वरिष्ठ नेतृत्व त्यांच्या उमेदवारीबाबत कोणती भूमिका घेते आणि आगामी निवडणुकीत पक्ष कोणता चेहरा मैदानात उतरवतो, याकडे शिक्षकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
------------------------------------------------
लेख विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर
(वरुड जिल्हा अमरावती)
-------------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments