adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जुने साहित्य दातृत्व करा - प्रांताधिकारी किरण सावंत

  जुने साहित्य दातृत्व करा - प्रांताधिकारी किरण सावंत  शौकतभाई शेख/ श्रीरामपूर: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) समाजातील गरजू, निराधारांना मदत ...

 जुने साहित्य दातृत्व करा - प्रांताधिकारी किरण सावंत 


शौकतभाई शेख/ श्रीरामपूर:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

समाजातील गरजू, निराधारांना मदत म्हणून आपणाकडे असणारे चांगल्या स्थितीतील वापरता येतील असे शर्ट, पॅन्ट, साड्या, स्वेटर, लहान मुलांचे कपडे, चादर,सतरंजी, चप्पल, शूज ,सायकली,भांडी देऊन दातृत्व करावे असे आवाहन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत यांनी केले आहे.

      रेड क्रॉस सोसायटीचे वतीने जिल्ह्यातील निराधारांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप करावयाचे आहे त्यासाठी आपल्याकडील असलेले  साहित्य उपयोगात येण्यासाठी दान करून सत्कर्म करावे.

        साहित्य देताना चांगल्या स्थितीतील असावे निदान त्याचा   वापर होण्याजोग असावे. बऱ्याच कुटुंबाकडे असे साहित्य असतात पण ते उपयोगात येत नाही त्यासाठी रेड क्रॉसच्या वतीने वरील मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी किरण सावंत यांनी सांगितले..

      वरीलपैकी काही  वस्तूंचा जुना स्टॉक व्यापाऱ्यांकडे असेल तर तो ही सढळ हाताने मदत करावा.विविध गावातील अशा कुटुंबाची माहिती घेऊन सर्वेद्वारे योग्य व्यक्तींनाच सदरच्या वस्तूचा लाभ देणार आहे. वस्तू देण्यासाठी सुनील साळवे डी.डी. काचोळे विद्यालय श्रीरामपूर यांचेशी संपर्क करावे असे आवाहन प्रांताधिकारी किरण सावंत यांनी केले आहे

        इंडियन रेड क्रॉसची मोहीम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, सचिव सुनील साळवे,पोपटराव शेळके, अरुण कतारे, विनीत कुंकुळोळ, प्रवीण साळवे, श्रावण भोसले सचिन चंदन, सुरंजन साळवे, संजय दुशिंग, साहेबराव रक्ते, ज्ञानदेव माळी, सुभाष बोधक, अमोल नलावडे, विश्वास भोसले, सुरेश वाघुले, बन्सी फेरवाणी, गणेश थोरात, केशव धायगुडे, पुष्पाताई शिंदे, शोभा शेंडगे, निर्मला लांडगे, सुवर्णा बोधक, मायाताई चाबुकस्वार, आदी परिश्रम घेत आहेत.

-----------------------------------------------

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments