adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संत मदर तेरेसा यांचे मानवसेवेचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी - विजयराव खाजेकर

संत मदर तेरेसा यांचे मानवसेवेचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी - विजयराव खाजेकर शौकतभाई शेख/श्रीरामपूर:  (संपादक : हेमकांत गायकवाड)  नव स्वराज्...

संत मदर तेरेसा यांचे मानवसेवेचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी - विजयराव खाजेकर




शौकतभाई शेख/श्रीरामपूर: 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

 नव स्वराज्य सेनेच्या वतीने येथील संत मदर तेरेसा चौक (एस.एम.टी.सर्कल) याठिकाणी मदर तेरेसा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संत मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी नव स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव खाजेकर यांनी संत मदर तेरेसा यांच्या कार्याला उजाळा देताना सांगितले की, संत मदर तेरेसा यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब, वंचित, निराधार आणि गरजूंच्या सेवेसाठी समर्पित केले. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून त्यांच्या सेवाभावी कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमास ठाकूर सर, शरद चव्हाण, अजय कोकाटे, दशरथ भोंगळे, दत्तू शिरसाठ,प्रवीण कदम यांच्यासह नव स्वराज्य सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मदर तेरेसा यांच्या समाजसेवेच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर -9561174111

No comments