adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पैगंबर जयंतीनिमित्त अल करम हॉस्पिटल व खिदमत सोशल फाउंडेशनतर्फे फळांचे वाटप पैगंबरांच्या जीवनाचा मुख्य संदेश मानवतेची सेवा, प्रेम, बंधुभाव आणि गरजूंच्या मदतीचा आहे - हाफीज अर्शद सय्यद

पैगंबर जयंतीनिमित्त अल करम हॉस्पिटल व खिदमत सोशल फाउंडेशनतर्फे फळांचे वाटप पैगंबरांच्या जीवनाचा मुख्य संदेश मानवतेची सेवा, प्रेम, बंधुभाव आण...

पैगंबर जयंतीनिमित्त अल करम हॉस्पिटल व खिदमत सोशल फाउंडेशनतर्फे फळांचे वाटप

पैगंबरांच्या जीवनाचा मुख्य संदेश मानवतेची सेवा, प्रेम, बंधुभाव आणि गरजूंच्या मदतीचा आहे - हाफीज अर्शद सय्यद 




शौकतभाई शेख श्रीरामपूर:

(संपादक : हेमकांत गायकवाड)

पैगंबर हजरत मोहम्मद  यांच्या जीवनाचा मुख्य संदेश मानवतेची सेवा, प्रेम, बंधुभाव आणि गरजूंच्या मदतीचा आहे. समाजातील अनाथ व निराधार मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हीच खरी मानवसेवा आहे. पैगंबर जयंतीच्या निमित्ताने फळांचे वाटप करण्याचा हा छोटासा उपक्रम असून, भविष्यातही गरजू घटकांसाठी अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.असे प्रतिपादन हाफीज सय्यद अर्शद यांनी केले.

पैगंबर जयंतीनिमित्त अल करम हॉस्पिटल व खिदमत सोशल फाउंडेशनच्या वतीने अ. नगर येथील तपोवनरोड वरील अनाथ व निराधार विद्यार्थ्यांच्या बालघर प्रकल्पात फळांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी अकीब इकबाल सय्यद, तौसिफ रेडियमवाला, हाफीज सय्यद अर्शद, शेख उसामा, तौफिक तांबोली, युवराज गुंड, आबीद दुलेखान,राजीक खान, सरफराज भाई,शेरअली शेख, एजाज तांबोली आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तौफिक तांबोली यांनी केले. प्रास्ताविक उसामा शेख यांनी केले, तर आभार अकीब इकबाल यांनी मानले. उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.


वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार अबीदभाई शेख 


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments