adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमरावती जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संजय खासबागे यांची नियुक्ती

  अमरावती जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संजय खासबागे यांची नियुक्ती  वरुड / प्रतिनिधी: (संपादक -:- हे...

 अमरावती जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संजय खासबागे यांची नियुक्ती 




वरुड / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अमरावती जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी येथील यश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तथा वरिष्ठ पत्रकार संजय खासबागे यांची निवड करण्यात आली आहे. संजय खासबागे हे पत्रकारिता क्षेत्रासोबतच मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा विचार करून त्यांच्यावर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 त्यांच्या माध्यमातून अमरावती जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक प्रसिद्धी मिळून संघटनेच्या विविध उपक्रमांना निश्चितच चालना मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष अजय जाधव, जिल्हा सचिव सोपान ढोले, गुहे,अन्शुल पाल, सचिन तांबटकर, संजय बदखुळे, हरीश ढोबळे , जगदीश वर्होकर, राधेश्याम हरणे अमोल बांबल, आकाश चौधरी , अविनाश वर्होकर यांचेसह मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक उपस्थित होते. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शाखा वरूड यांच्या वतीने संजय खासबागे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शाखा वरूड यांच्या वतीने संजय खासबागे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

--------------------------------------------

वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर

----------------------------------------------

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments