adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शितल प्रशांत कानाडे यांची जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे शिक्षक पदावर नियुक्ती

 शितल प्रशांत कानाडे यांची जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे शिक्षक पदावर नियुक्ती   जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर यांजकडून  शितल प्रशांत कानाडे यांन...

 शितल प्रशांत कानाडे यांची जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे शिक्षक पदावर नियुक्ती 


 जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर यांजकडून 

शितल प्रशांत कानाडे यांनी आपल्या जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे पवित्र पोर्टल द्वारे  शिक्षक पदावर नियुक्ती मिळवून आपल्या कुटुंबाचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. शितल प्रशांत कानाडे या एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी अभ्यासासोबतच शिक्षक भरतीची संधी साधली. अत्यंत कष्टाळू, जिद्दी आणि ध्येयवेड्या असलेल्या शितल यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपले प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले. नुकत्याच झालेल्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेत त्यांनी यश संपादन करून शिक्षक होण्याचे स्वप्न साकार केले. त्यांच्या या यशामागे असलेली मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आज सार्थकी लागले आहेत. त्यांच्या यशामुळे कानाडे परिवारात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षक म्हणून नव्या जबाबदारीची सुरुवात करताना त्यांच्या ज्ञानाचा, संस्कारांचा आणि कर्तृत्वाचा असंख्य विद्यार्थ्यांना लाभ होवो. त्यांच्या हातून उत्तम विद्यार्थी घडावेत आणि शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, हीच मनःपूर्वक सदिच्छा. या उल्लेखनीय यशाबद्दल कानाडे परिवाराकडून सौ. शितल प्रशांत कानाडे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी, यशस्वी वाटचालीसाठी आणि उत्तरोत्तर प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रतिक्रिया

शितलच्या जिद्दीला, चिकाटीला आणि मेहनतीला    सलाम ! 

जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर शितलने नुकत्याच झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत यश संपादन करून शिक्षक होण्याचे आपले स्वप्न साकार केले. 

प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयापासून विचलित न होता सातत्याने केलेल्या परिश्रमाचे हे सुंदर फळ आहे. तिच्या या यशामागे असलेली मेहनत, आत्मविश्वास आणि चिकाटी निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

शितल, तुझ्या या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 

तुझ्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 


— प्रशांत कानडे

ग्रामपंचायत अधिकारी,

ग्रुप ग्रामपंचायत गंगावऱ्हे सावरगाव ता. जि. नाशिक

No comments