adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या कला शिक्षक राजू साळीनीं खडूच्या साह्याने फलक लेखनावर साकारले स्वातंत्र्याच्या आठवणी

 फैजपूरच्या कला शिक्षक राजू साळीनीं खडूच्या साह्याने फलक लेखनावर साकारले स्वातंत्र्याच्या आठवणी    इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:-;हेमकांत ग...

 फैजपूरच्या कला शिक्षक राजू साळीनीं खडूच्या साह्याने फलक लेखनावर साकारले स्वातंत्र्याच्या आठवणी   


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:-;हेमकांत गायकवाड)

फैजपूर :आपण जर का थोडासा भूतकाळाचा विचार केला तर  15 ऑगस्ट 1947 ला भारताला जवळपास 200 वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले त्यासाठी बऱ्याच लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान करून स्वातंत्र्य मिळविले. आजही आपण जुन्या काळचा विचार केला तर अंगाला काटा येईल.असे महान कार्य त्या काळातील जवानांनी केले व बरेच जवान शहीद झाले.जे शहीद झाले ते अमर झाले.तसेच काही ना काही नविन करण्याचा ध्यासमनी बाळगणारे श्री. एस.बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव येथील कला शिक्षक राजू साळी यांनी  रंगीत खडू व कोळसा माध्यम वापरून "आठवण स्वातंत्र्याची" फलक लेखन करण्यात आले.सदर फलक लेखनावर 1947 "आठवण स्वातंत्र्याची "असा देखावा दाखवण्यात आलेला असून फलक लेखन बघितल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळून असा भास निर्माण होतो. तसेच राजू साळी यांचे शाळेचे चेअरमन अंकुश भाऊ चौधरी सचिव, सभासद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती चौधरी पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले

No comments