adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजन

 तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजन   प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तालुकास्तरीय अखिल भारत...

 तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजन  


प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी जे ई स्कूल मुक्ताईनगर येथे शासन परिपत्रकानुसार उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एम. चौधरी सर (प्राचार्य जे. ई. स्कूल मुक्ताईनगर) प्रमुख पाहुणे वसंतराव मोरे साहेब (गटशिक्षणाधिकारी मुक्ताईनगर) महेंद्र मालवेकर (विषय तज्ञ) .

तसेच मुक्ताईनगर तालुका विज्ञान सहसमन्वयक सी.डी. पाटील (अध्यक्ष विज्ञान मंडळ ) अर्चना देशमुख (सचिव विज्ञान मंडळ ) सचिन ठाकूर (सहसचिव विज्ञान मंडळ) दीपक गुळवे (भुसावळ पतपेढी सदस्य) हे सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. 

      विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचा विषय भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 चे भवितव्य आणि आव्हाने या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी प्रस्तुतीकरण केले.

या प्रस्तुतीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची उपयुक्तता, ऊर्जेचे महत्व व सामाजिक जाणीव प्रभावी पद्धतीने प्रस्तूतीकरण सादर केले. या मेळाव्यात तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला.

            तालुक्यातून जे ई स्कूल मुक्ताईनगर ची विद्यार्थिनी देवश्री विकास पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला. विशेष देवश्री ची जिल्हास्तरासाठी निवड झाली असून विज्ञान शिक्षिका अर्चना झांबरे व तिलोत्तमा ढाके यांच्याकडून देवश्रीला  मार्गदर्शन करण्यात आले.सदर  प्रसंगी

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले.

No comments