तडवी द गाईडतर्फे आदिवासी दिन उत्साहात साजरा रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ‘द गाईड जनजातीय गौरव महोत्सव’च्या मा...
तडवी द गाईडतर्फे आदिवासी दिन उत्साहात साजरा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
‘द गाईड जनजातीय गौरव महोत्सव’च्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय व सांस्कृतिक उपक्रम
आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, भाषा आणि गौरवशाली इतिहासाचे जतन करण्यासोबतच समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तडवी द गाईडतर्फे आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम तडवी कॉलनी, भुसावळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक भुसावळ येथील खलील अमीर तडवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून फत्तू रमजान तडवी, पोस्टमास्टर, फैजपूर तसेच अमीन सलीम तडवी, अभियंता, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया उपस्थित होते. यावेळी जावेद कलिंदर तडवी, जरदार सरदार तडवी, रशीद इतबार तडवी, शब्बीर रमजान तडवी आणि इतर समाजबांधवांची प्रमुख उपस्थिती होती.
आदिवासी दिनाचे औचित्य साधून ‘द गाईड जनजातीय गौरव महोत्सव – २०२६’ अंतर्गत विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थी, पालक, युवक आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महोत्सवाच्या माध्यमातून जीवनदान अभियान, ‘एक कुटुंब – एक झाड’ वृक्षारोपण अभियान, ज्ञानदान अभियान, कृतज्ञता दिवस, आदिवासी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आदिवासी नृत्य स्पर्धा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.
‘एक कुटुंब – एक झाड’ अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संघटन आणि सामाजिक एकजूट यांचे महत्त्व अधोरेखित केले. आदिवासी समाजाची संस्कृती, भाषा आणि परंपरा जपत नव्या पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन करण्यात आले.
“चला शिकू समाजाकडून आणि समाजात सकारात्मक बदल घडवूया,” या विचारातून तडवी द गाईडच्या वतीने भविष्यातही सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तडवी द गाईडचे पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवक, विद्यार्थी, पालक आणि सहकार्य करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद सिराज तडवी आणि आभारप्रदर्शन अशफाक जरदार तडवी यांनी मानले.


No comments