adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धनाजी नाना महाविद्यालयात आदिवासी दिवस व ऑगस्ट क्रांती दिवस उत्साहात साजरा

  धनाजी नाना महाविद्यालयात आदिवासी दिवस व ऑगस्ट क्रांती दिवस उत्साहात साजरा इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील ता...

 धनाजी नाना महाविद्यालयात आदिवासी दिवस व ऑगस्ट क्रांती दिवस उत्साहात साजरा


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण व उत्सव समिती आणि विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित जागतिक आदिवासी दिवस व ऑगस्ट क्रांती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर काशिनाथ चौधरी व सचिव प्रा.मुरलीधर तोताराम फिरके, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांच्या शुभहस्ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर योद्धे व आदिवासी नेते जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी आदिवासी दिवसाच्या औचित्याने रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. शेरसिंग पाडवी यांनी आदिवासी दिवसाची स्थापना, उद्देश व आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमासंदर्भात सविस्तर विवेचन करीत संयुक्तराष्ट्र संघटनेच्या निर्देशानुसार आदिवासी सुईनींचा सन्मान या विषयाअंतर्गत आदिवासींकडे असलेले पारंपरिक ज्ञान आधुनिकतेशी जोडले जाण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा असे आवाहन केले.

इतिहास विभागाचे प्रा डॉ मारुती जाधव यांनी ऑगस्ट क्रांती दिवसाच्या आठवणींना उजाळा देत खानदेशच्या भूमीत कर्मयोगी दादासाहेब धनाजी नाना चौधरी यांचे कार्य व स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांची तळमळ व भूमिका आणि ब्रिटिश सरकारने केलेली कार्यवाही यांची पुराव्यानिशी सादरीकरण करून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्वस्व बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे सदैव स्मरण ठेवून देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने सहयोग द्यावा असे नम्र आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भूगोल विभागातील प्रा दीपक पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे उपप्राचार्य व समिती चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सण व उत्सव समितीतील सदस्य,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन परिश्रम घेतले.

No comments