adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वृद्धाश्रम व बालकाश्रमात अन्नदान करून केला मुलीचा वाढदिवस साजरा

 वृद्धाश्रम व बालकाश्रमात अन्नदान करून केला मुलीचा वाढदिवस साजरा  भरत कोळी यावल  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल नगरपालिकेचे भारतीय जनता प...

 वृद्धाश्रम व बालकाश्रमात अन्नदान करून केला मुलीचा वाढदिवस साजरा 


भरत कोळी यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल नगरपालिकेचे भारतीय जनता पक्षाचे तरुण नगरसेवक योगेश चौधरी यांनी आपली कन्या दिक्षिता योगेश चौधरी हिचा पाचवा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. चोपडा तालुक्यातील वेले येथील मानव सेवा तीर्थ आश्रम शाळा व वृद्धाश्रमात अन्नदान करून हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने वायफळ खर्च न करता गरजू वृद्ध व बालकांसोबत आनंद वाटण्याचा उपक्रम राबवून चौधरी परिवाराने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. यावल नगरपालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक कै. विजय चौधरी यांची नात आणि विद्यमान भाजप नगरसेवक योगेश चौधरी यांची कन्या दिक्षिता हिच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसाठी अन्नदान करण्याचा नगरसेवक योगेश चौधरी यांचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. 


या कार्यक्रमाला योगेश चौधरी यांच्या मित्रपरिवारातील रितेश बारी, उज्वल कानडे, धनराज कोळी, भूषण फेगडे, नितीन बारी, कुणाल पाटील यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.

No comments