adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यात महसूल विभागाची मोठी कारवाई; सुटकार येथे अवैध वाळूचे साठे जप्त करून केले नष्ट

चोपडा तालुक्यात महसूल विभागाची मोठी कारवाई; सुटकार येथे अवैध वाळूचे साठे जप्त करून केले नष्ट  चोपडा ता. प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकव...

चोपडा तालुक्यात महसूल विभागाची मोठी कारवाई; सुटकार येथे अवैध वाळूचे साठे जप्त करून केले नष्ट 


चोपडा ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : तालुक्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन आणि साठवणुकीविरुद्ध महसूल प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मौजे सुटकार (ता. चोपडा) येथे बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला वाळूचा साठा महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत जप्त केला. एवढेच नव्हे तर हा वाळू साठा पुन्हा वापरात येऊ नये यासाठी तो घटनास्थळीच पूर्णतः नष्ट करण्यात आला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महसूल पथकाने सुटकार शिवारात अचानक धाड टाकली. या पाहणीदरम्यान नदीपात्र आणि आसपासच्या परिसरातून चोरट्या मार्गाने आणून साठवलेली वाळूचा मोठा ढीग आढळून आला. पथकाने तात्काळ हा साठा जप्त करत त्यावर कायदेशीर कारवाई केली आणि जेसीबीच्या साहाय्याने तो नष्ट केला. ही कारवाई अडावदचे मंडळ अधिकारी, सुटकारचे ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, सुटकारच्या सरपंच आणि पोलिस पाटील यांच्या संयुक्त पथकाने राबवली. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे शासनाचा महसूल बुडवून अवैध वाळू उपसा व साठवणूक करणाऱ्या वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. नदीपात्रातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून अनधिकृतपणे वाळूचे उत्खनन, वाहतूक अथवा साठवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. गौण खनिज नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही प्रशासनाकडून कठोर व दंडात्मक कारवाई सत्र सुरूच राहील, असा थेट इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.

No comments