तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीचा भक्तीचा जागर सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा भरत कोळी यावल ...
तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीचा भक्तीचा जागर सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
१५ ऑगस्ट २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा शाळेचे अध्यक्ष डॉ .प्रदीप माहेश्वरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ शीला तायडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . शीला तायडे मॅडम यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करून करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्याध्यापिका सौ. शीला तायडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगून देशाची एकता, अखंडता आणि प्रगती यासाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा संस्मरणीय आणिअविस्मरणीय ठरला

No comments