कै. समाधान नारायणराव हांडके पाटील यांचे दुःखद निधन नेशन महाराष्ट्रच्या खामगाव तालुका प्रतिनिधी पल्लवी पाटील यांचे मोठे बाबा अमोल बावस्कार ब...
कै. समाधान नारायणराव हांडके पाटील यांचे दुःखद निधन
नेशन महाराष्ट्रच्या खामगाव तालुका प्रतिनिधी पल्लवी पाटील यांचे मोठे बाबा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव : नेशन महाराष्ट्रच्या खामगाव तालुका प्रतिनिधी, शिवसेना कार्यकर्त्या व दिव्यांग सेविका पल्लवी पाटील यांचे मोठे वडील कै. समाधान नारायणराव हांडके पाटील यांचे आज, शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कै. समाधानराव हांडके पाटील हे मूळचे शिवाजी वेश, खामगाव, जि. बुलढाणा येथील रहिवासी होते. गेल्या काही काळापासून ते नाशिक येथे वास्तव्यास होते. अत्यंत कर्तव्यनिष्ठ, मृदू स्वभावाचे तसेच कुटुंबातील सर्वांना एकत्र ठेवणारे आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती. सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा मोठा मान-सन्मान होता.
त्यांच्या निधनाने हांडके पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
कै. समाधान नारायणराव हांडके पाटील यांच्या पश्चात ४ मुले, ५ मुली, ५ भाऊ व ५ बहिणी असा मोठा परिवार आहे.
कै. समाधान नारायणराव हांडके पाटील यांचा अंत्यविधी उद्या, रविवार दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता नाशिक येथील अमरधाम, गणेशवाडी, पंचवटी येथे होणार आहे.
आप्तेष्ट, मित्रमंडळी, हितचिंतक तसेच परिचितांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, अशी विनम्र विनंती हांडके पाटील परिवारातर्फे करण्यात आली आहे.
शोकाकुल :
हांडके पाटील परिवार
पल्लवी पाटील (पत्रकार)
तालुका प्रतिनिधी – नेशन महाराष्ट्र
शिवसेना कार्यकर्त्या | दिव्यांग सेविका
खामगाव, जि. बुलढाणा


No comments