adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बामणोद महसूल मंडळातर्फे कोसगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप महसूल मंडळ बामणोदचा कौतुकास्पद उपक्रम

 बामणोद महसूल मंडळातर्फे कोसगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप महसूल मंडळ बामणोदचा कौतुकास्पद उपक्रम  भरत कोळी यावल (संपादक -...

 बामणोद महसूल मंडळातर्फे कोसगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

महसूल मंडळ बामणोदचा कौतुकास्पद उपक्रम 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने महसूल मंडळ बामणोद, ता. यावल यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, को सगाव येथे दप्तर वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमास मंडळाधिकारी दीपक गवई, ग्राम महसूल अधिकारी सुचिता देशभ्रतार, विजयश्री साठ, शैलेश झोटे, दिलीप केदारे, मंजूशा पाटील, महसूलसेवक प्रशांत सरोदे व सपना कोळी तसेच शाळेचे मुख्याध्यापक किरण यशवंत पाटील आणि शिक्षक महेश भास्कर पाटील उपस्थित होते.

दप्तर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह पाहून उपस्थितांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले. महसूल विभाग केवळ प्रशासकीय जबाबदारी पार पाडणारा विभाग नसून सामाजिक बांधिलकी जपणारा विभाग म्हणूनही पुढे यावा, या भावनेतून हा उपक्रम घेण्यात आला.

यावेळी मंडळाधिकारी दीपक गवई यांनी विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करण्याचे, मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

“आज एका विद्यार्थ्याच्या हातात दिलेले दप्तर म्हणजे केवळ शैक्षणिक साहित्य नसून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली एक छोटीशी प्रेरणा आहे,” या भावनेतून महसूल मंडळ बामनोदच्या वतीने पुढील काळातही विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महसूल मंडळ बामनोदच्या या कौतुकास्पद सामाजिक उपक्रमाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून मनापासून स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

No comments