adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसांसह तरुण अटकेत रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई !

  गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसांसह  तरुण अटकेत ;  रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई !   मुबारक तडवी रावेर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर ...

 गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसांसह  तरुण अटकेत रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! 


 मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर शहरातील बसस्थानकाच्या मागील बाजूस छोरीया मार्केटजवळ एक इसम शस्त्र बाळगून संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या तरुण रावेर पोलिसांच्या कचाट्यात सापडला असून 

या तरुणाला रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली . अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून  २५ हजार रुपये किमतीचा  गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी करण्यात आली.


रावेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, रावेर बसस्थानकाच्या मागील बाजूस छोरीया मार्केटजवळ एक इसम शस्त्र बाळगून संशयास्पदरीत्या फिरत आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी रावेर पोलिसांचे गुन्हे शोध

पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकार शेख, प्रमोद पाटील, विशाल पाटील आणि संभाजी बिजागरे आदिंसह 

 पथक तात्काळ बसस्थानक परिसरात दाखल झाले. पोलिस पथक छोरीया मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचले असता, अंदाजे २० वर्षांचा एक तरुण पोलिसांच्या नजरेत आला. त्याने खाकी रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पँट परिधान केली होती. पोलिस पथकाला पाहताच त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली. अंगझडतीदरम्यान त्याच्या कमरेला खोचलेला तपकिरी रंगाचा लोखंडी धातूचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आला. या कट्ट्याची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली.


पोलिसांनी संशयिताची चौकशी केली असता त्याने आपले नाव कृष्णा दत्तू पाटील, वय २० वर्षे, रा. रोकडा हनुमान मंदिर नगर, रावेर असे सांगितले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९८/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३ सह २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत 

सदरची  कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकार शेख, प्रमोद पाटील, विशाल पाटील आणि संभाजी बिजागरे यांनी केली.

No comments