सावदा पोलीस स्टेशनमध्ये अवैध सावकारी प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल! ३७ लाखांचे वर बेकायदेशीर वसुलीचा आरोप! मुबारक तडवी रावेर (संपादक...
सावदा पोलीस स्टेशनमध्ये अवैध सावकारी प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!
३७ लाखांचे वर बेकायदेशीर वसुलीचा आरोप!
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अवैध सावकारी च्या चक्रवाढ व्याजाने कर्ज देऊन कर्जदाराची वडिलोपार्जित शेती स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा तसेच तब्बल ३७लाख ७४ हजार ३२५ रुपयांची अवैध वसुली केल्याचा आरोप असलेल्या जिल्ह्यातील दोन जणांविरुद्ध सावदा पोलिस स्टेशनमध्ये जळगांव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्या आदेशानंतर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सहकार अधिकारी प्रदीप माधवराव महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील चुडामण नारायण जंगले आणि त्र्यंबक नारायण जंगले यांनी शेती लागवडीसाठी संशयित आरोपी अशोक जगन्नाथ पाटील (७५) आणि राजेंद्र जगन्नाथ पाटील (६०) यांच्याकडून चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते
या प्रकरणी अर्जदारांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.या आदेशानुसार सावदा पोलिस ठाण्यात गु.र.नं. २१५/२०२६ अन्वये महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.

No comments