एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत महात्मा फुले हायस्कूल येथे वृक्षारोपण !.. सामाजिक वनीकरण विभागाकडून १०० वृक्षांची रोपे भेट ! विकास पाटील...
एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत महात्मा फुले हायस्कूल येथे वृक्षारोपण !..
सामाजिक वनीकरण विभागाकडून १०० वृक्षांची रोपे भेट !
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत सामाजिक वनीकरण धरणगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती बी बी सांगळे यांच्या मार्गदर्शनाने आर यु घोडे ( वनपाल ), एन एन शिरसागर ( वनपाल ), श्रीमती एस आय शिंदे ( वनरक्षक ) यांच्या माध्यमातून एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १०० वृक्षांची रोपे भेट देण्यात आली.
सर्वप्रथम शाळेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर वनपाल आर यु घोडे यांनी शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील, एच डी माळी यांना वृक्षांचे रोप भेट दिले. यानंतर शाळेच्या परिसरामध्ये शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांच्या हस्ते नीम, वड , पिंपळ असे विविध रोपांची लागवड करण्यात आली. आजच्या वर्तमान काळात वृक्षांची लागवड होणे गरजेचे आहे. " झाडे लावा - झाडे जगवा " हा संदेश देत वृक्षांची विस्तृतपणे माहिती सांगून वृक्षांचे संवर्धन प्रत्येकाने केले पाहिजे असे प्रतिपादन वनपाल आर यू घोडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एच डी माळी यांनी मानले.

No comments