रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद'च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड जागतिक आदिवासी दिनी नाशिक येथे ना. हर्षवर...
रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद'च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड
जागतिक आदिवासी दिनी नाशिक येथे ना. हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
नाशिक (विशेष प्रतिनिधी):
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रामदास आईदास पावरा यांची अधिकृत निवड झाली आहे. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त रविवारी (९ ऑगस्ट) नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे आयोजित भव्य सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या हस्ते श्री. पावरा यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
श्री. रामदास पावरा यांचे सामाजिक कार्य व समाजाबद्दलची तळमळ लक्षात घेऊन, परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष मा. लकीभाऊ जाधव आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. इंजि. गणेशभाऊ गवळी यांनी संगणमताने ही निवड केली.
हजारो आदिवासी बांधवांची उपस्थिती:
नाशिक येथील ऐतिहासिक गोल्फ क्लब मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी तसेच पारंपरिक पेहरावात हजारो आदिवासी बांधव, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेबाबत:
देशातील ज्येष्ठ केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार व आदिवासी नेत्यांनी स्थापन केलेली ही राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य संघटना आहे.
सामान्य आदिवासी जनतेच्या न्यायहक्कांसाठी ही परिषद संपूर्ण भारतभर प्रामाणिकपणे व आक्रमक लढा देते.
"परिषदेने सोपवलेली ही जबाबदारी स्वीकारून तळागाळातील तरुण-तरुणींच्या प्रश्नांसाठी आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन," अशी प्रतिक्रिया नियुक्तीनंतर श्री. रामदास पावरा यांनी दिली.

No comments