नैसर्गिक शेती विषमुक्त शेती करून या निर्याशन केळी उत्पादक या विषयावर प्रशिक्षण चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड) गलंगी ...
नैसर्गिक शेती विषमुक्त शेती करून या निर्याशन केळी उत्पादक या विषयावर प्रशिक्षण
चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
गलंगी ता, चोपडाअंतर्गत सन 2026- 27 जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण मौजे गलंगी तालुका चोपडा जळगाव माधव देवराज यांच्या शेतात नैसर्गिक शेती विषमुक्त शेती करून या निर्याशन केळी उत्पादक या विषयावर माऊली कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले प्रशिक्षणात निवृत्त सेल टॅक्स कमिशनर श्री देवराज व निवृत्त उपविभागीय पोलीस निरीक्षक श्री देवराव तसेच निवृत्त सरकारी वकील एच डी सोनवणे व पुरस्कार प्राप्त शेतकरी संदीप देसले तसेच धुळे जिल्ह्यातली शिरपूर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी तालुक्यातील विविध गावातले नैसर्गिक शेती करणारे शेतकरी यांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली कार्यशाळेत कुरबान तडवी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा व उपक्रम संचालक श्री इंगळे व चोपडा तालुका कृषी अधिकारी चोपडा दिपक साळुंखे तसेच मंडळ कृषी अधिकारी एन डी जाधव व कृषी अधिकारी चेतन साळुंखे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी राहुल साळुंखे व महेंद्र साळुंखे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चोपडा यांच्यासह तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली तसेच तालुक्यातील अशोक कोळी न्यूज प्रतिनिधी यांनी चांगल्या प्रकारे प्रश्न उत्तर द्वारे माऊली कापसे यांचे मार्गदर्शन ऐकून घेतले तसेच जिल्ह्याबाहेर आलेले सर्व शेतकरी यांनी सुद्धा या कार्यक्रमास माहितीपूर्वक लाभ घेतला व सर्व गोष्टी समजून ऐकल्या आणि पूर्णपणे सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात समक्ष पाहणी केली व गडांची ग्रोथ ही सुद्धा पाहणी केली शेतकरी समाधान झाले की आपणही विषमुक्त शंभर टक्के शेतीकडे वळूया असं काही शेतकऱ्यांनी तिथे आपली बाजू मांडली. माऊली कापसे यांनी त्यांना सविस्तरपणे या विषयावर माहिती दिली व ती शेतकऱ्यांना शंभर टक्के समजून घेतलं माऊली कापसे यांनाही शेतकऱ्यांनी काही विचारपूस केली व त्यांनी सविस्तर माहिती समजून शेतकऱ्यांना सांगितले माऊली कापसे यांच्या एकच ध्यास 100% विषमुक्त आपण करूया असे त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले


No comments