चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशोक कोळी चोपडा (स...
चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
अशोक कोळी चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
(दि. १ ऑगस्ट २०२६): श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक), चोपडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या साहित्य, सामाजिक कार्य, राष्ट्रभक्ती व स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण केले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला, तर लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याच्या विचारातून स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.सदरील कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments