सनपूले येथील काळभैरव माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उस्ताहात साजरी सनपुले ता चोपड...
सनपूले येथील काळभैरव माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उस्ताहात साजरी
रविंद्र कोळी अडावद
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद येथून जवळच असलेल्या सनपूले तालुका चोपडा येथील काळभैरव माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व ज्येष्ठ शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उस्ताहात साजरी करण्यात आली सरस्वती पूजनाने ईशातवन म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.व्हि.के पाटील हे होते कार्यक्रमात इ ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांच्या छोट्या गटातून एकूण १५ विद्यार्थ्यांनी तर इ ८ वी ते १० वी च्या ८ विद्यार्थ्यांनी उस्पूर्तपने सहभाग नोंदविला यात कार्यक्रमानंतर सहभागी विद्यार्थ्यांमधून स्पर्धक निवडले गेले असता छोट्या गटातून इ.६ वी ची वैष्णवी राहुल कोळी हा विद्यार्थीनी प्रथम आली तर मोठ्या गटातून.इ.१० वी ची देवयानी वासुदेव बाविस्कर ही प्रथम आली त्यांना अध्यक्षांच्या वतीने बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाला शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एस.सी.पाटील,एस डब्ल्यु पाटील,बी आर बागुल,आर यू जाधव,डी एच पाटील,की एस बाविस्कर,आर एस पावरा एम एन निंभोरे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पारपाडण्यासाठी लिपिक संजय पाटील,नरेंद्र पाटील,रवींद्र पाटील परिश्रम घेतले प्रास्ताविक डी एच पाटील यांनी तर सूत्रसंचालन एस सी पाटील यांनी केले आभार आर यू जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले

No comments