adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नूतन मराठा महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

 नूतन मराठा महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा  जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयाच्...

 नूतन मराठा महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील होते. यावेळी मंचावर उपप्राचार्या डॉ. माधुरी पाटील, प्रा. डी. वाय. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एन. जे. पाटील, प्रमुख वक्ते प्रा. राकेश गोरसे तसेच प्रा. रामेश्वर निंबाळकर उपस्थित होते. 


यावेळी आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा, लोककला, निसर्गाशी असलेले नाते तसेच आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आणि त्यांच्या हक्कांविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि राष्ट्राच्या विकासातील योगदान यांची माहिती मिळाली. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. घनश्याम पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रामचंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments