adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक आदिवासी दिनानिमित्त चोपडा काँग्रेसतर्फे महानायक बिरसा मुंडा यांना अभिवादन

 जागतिक आदिवासी दिनानिमित्त चोपडा काँग्रेसतर्फे महानायक बिरसा मुंडा यांना अभिवादन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : रविव...

 जागतिक आदिवासी दिनानिमित्त चोपडा काँग्रेसतर्फे महानायक बिरसा मुंडा यांना अभिवादन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा.भैय्यासाहेब ॲड संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महानायक बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी व न्यायासाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याचे स्मरण केले. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास तालुकाध्यक्ष मोहन पाटील, रमेश शिंदे, मधुकर बाविस्कर,प्रदेश उपाध्यक्ष सेवादल अजबराव पाटील,माजी शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे,जिल्हा सचिव आरिफ शेख,राजेंद्र पाटील, छन्नू पाटील, विकास पाटील , किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे, फातिमा बी पठाण, प्रवीण जैन,देविदास पारधी, शांताराम लोहार, यशवंत खैरनार, दीपक चौधरी, अकिल शेख, मुकेश बारेला,इलियास पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments