adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घाडवेल–विचखेडा रस्ता पावसामुळे चिखलमय; पुलाचे काम तातडीने करण्याची ग्रामस्थांची मागणी

 घाडवेल–विचखेडा रस्ता पावसामुळे चिखलमय; पुलाचे काम तातडीने करण्याची ग्रामस्थांची मागणी  अशोक कोळी घाडवेल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सततच्य...

 घाडवेल–विचखेडा रस्ता पावसामुळे चिखलमय; पुलाचे काम तातडीने करण्याची ग्रामस्थांची मागणी 


अशोक कोळी घाडवेल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सततच्या पावसामुळे घाडवेल ते जुनं धुपे विचखेडा या मार्गावरील रस्ता अत्यंत खराब झाला असून, पुलाजवळ मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पुलाची दुरवस्था आणि रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी, चारचाकी तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना या मार्गावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी वाहनांची चाके चिखलात अडकत असून अपघाताचा धोका वाढला आहे. फोटोमध्येही पुलाजवळील चिखल, साचलेले पाणी आणि खराब झालेला मार्ग स्पष्ट दिसून येत आहे. 


ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना घाडवेल–विचखेडा मार्गावरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments