adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लखन पानपाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

 लखन पानपाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर  तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर  संपादक हेमकांत गायकवाड  जळगा...

 लखन पानपाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर 


तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर 

संपादक हेमकांत गायकवाड 

जळगाव : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ऑल इंडिया पँथर सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष लखन भाऊ पानपाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पुरस्काराची घोषणा झाल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेण्यात आली आहे.

समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे, वंचित व गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच सामाजिक चळवळ आणि संघटन मजबूत करण्यासाठी लखन पानपाटील सातत्याने कार्यरत आहेत.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना लखन पानपाटील म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. माझ्यावर कायम प्रेम, विश्वास आणि साथ ठेवणाऱ्या सर्व समाजबांधवांचा, सहकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि मित्रपरिवाराचा मी मनापासून आभारी आहे. आपल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे समाजासाठी पुढे लढण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे.”

या पुरस्काराबद्दल लखन पानपाटील यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, आगामी काळातही समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

No comments