शंभुक विद्यार्थी वसतिगृहात स्वांतत्र्यदिन उत्साहात साजरा शौकतभाई शेख / श्रीरामपूर : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बहुजन शिक्षण संघ संचलित ...
शंभुक विद्यार्थी वसतिगृहात स्वांतत्र्यदिन उत्साहात साजरा
शौकतभाई शेख / श्रीरामपूर :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बहुजन शिक्षण संघ संचलित शंभुक विद्यार्थी वसतिगृहात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.राखीताई श्रीनिवास बिहानी व जैन संघटनेच्या मीनाताई सुरेश दुग्गड यांच्या शुभहस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. राखीताई श्रीनिवास बिहाणी यांच्या शुभहस्ते वसतिगृहाचे ध्वजारोहण करण्यात आले.
प्रातिनिधिक स्वरूपात सौ. राखीताई बिहानी, पद्माताई भुतडा व परिवर्तन फाऊंडेशनचे ज्येष्ठ विश्वस्त रंभाजी कोळगे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब आल्हाट, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉक्टर सलीम शेख, नगरसेवक श्रीनिवास बिहानी, सुरेश दुग्गड यांच्या वतीने दिलेल्या खाऊचे मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्यदिना निमित्त वस्तीगृहातील विद्यार्थी अनुक्रमे अजित जाधव, संग्राम तुजारे,ऋषिकेश सुलताने, कुणाला साळवे, नमो करंडे, कृष्णा जाधव, अमोल घुले व तन्मय पाईकराव यांनी स्वातंत्र्य दिनावर आधारित भाषण करून सर्व मान्यवर अतिथींचे मने जिंकली. श्लोक तावरे, यश त्रिभुवन, कार्तिक चव्हाण, कृष्णा पवार, ओम जवादे, साई गायकवाड, सागर निंभोरे या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली. याप्रसंगी इनरव्हील क्लब चे पदाधिकारी डॉक्टर शितल घोगरे, प्रतिभाताई शिंदे, पुनम बिहाणी, छाया झंवर, सुनिता धुमाळ, पद्माताई भुतडा, स्वयंसिद्धा संस्थेच्या अनिता आहेर, अंबिका टेलरच्या संचालिका शांताताई खैरनार, दिव्याताई इंगळे मीनाताई सुरेश दुग्गड, कविता दिवे, पुनम दिवे, आनिता शर्मा, जाईबाई ससाणे व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे मिलिंदकुमार साळवे, माजी नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे, श्रीराम ट्रेडर्सचे संचालक रामभाऊ सुगुर, परिवर्तन फाउंडेशनचे गोरखराव आढाव, सामाजिक कार्यकर्ते अरुणराव मंडलिक, सुरेशराव दुग्गड, परिवर्तन फाउंडेशनचे रंभाजी कोळगे, बहुजन वंचित आघाडीचे संतोष त्रिभुवन,विजय जगताप, मगर वीट सप्लायरचे रविभाऊ मगर, अवधूत पारखे, भाजपा अल्पसंख्यांकचे साजिदभाई शेख, अनिल इंगळे, सुशील बर्वे, ज्येष्ठ सेवा नागरिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम सर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतीगृहाचे अशोकराव दिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ दिवे यांनी केले.
----------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments