adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बाभूळगावात कानुबाई मातेचा उत्सव थाटामाटात संपन्न! कानुबाई मातेच्या मिरवणुकीतून बाभूळगावात एकात्मतेचे दर्शन

  बाभूळगावात कानुबाई मातेचा उत्सव थाटामाटात संपन्न! कानुबाई मातेच्या मिरवणुकीतून बाभूळगावात एकात्मतेचे दर्शन विकास पाटील धरणगाव (संपादक -:- ...

 बाभूळगावात कानुबाई मातेचा उत्सव थाटामाटात संपन्न!

कानुबाई मातेच्या मिरवणुकीतून बाभूळगावात एकात्मतेचे दर्शन


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : खान्देशाची कुलदैवत कानुबाई मातेचा उत्सव बाभूळगावात यंदा मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि थाटामाटात संपन्न झाला. रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी गावातील विविध जाती-जमातींच्या कुटुंबांनी सर्वधर्मसमभावाची भावना जपत कानुबाई मातेची स्थापना केली.

कैलास धनगर कोळी व अशोक (भैया) मगन पाटील यांच्या निवासस्थानी ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात कानुबाई मातेचे स्वागत करून विधिवत स्थापना करण्यात आली. यापूर्वी शनिवारी पारंपरिक पद्धतीने भाजी-भाकरीचे रोट करण्यात आले. दुसऱ्या दिवशी कानुबाई मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर गावातील भाऊबंद, आप्तेष्ट, नातलग व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


बाभूळगावातील अनेक कुटुंबांनी आपल्या घरी कानुबाई मातेची स्थापना केली होती. त्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी एकमेकांच्या घरी भेटी देत कानुबाई मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली. डीजेच्या तालावर तरुणाईने जल्लोष केला, तर महिलांनी फुगड्या खेळत उत्सवाचा आनंद लुटला. मातेला निरोप देण्यासाठी संपूर्ण बाभूळगाव एकवटले होते.

विशेष म्हणजे या मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी एकत्र सहभागी होत सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविले. बाभूळगाव बसस्थानकापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. संपूर्ण गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढल्यानंतर गावाजवळील गिरणा नदीपात्रात कानुबाई मातेचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.

कानुबाई मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने बाभूळगावात एकता, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे वातावरण पाहायला मिळाले. उत्सवाच्या यशस्वी आयोजनामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

No comments