कवी रमेश पाटील यांच्या ‘ढुईका’ काव्यसंग्रहाचे प्रा. डॉ. फुला बागुल यांना प्रदान चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिरपू...
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिरपूर येथील थोर साहित्यिक प्राध्यापक डॉ. फुला बागुल यांना कवी रमेश पाटील यांनी आपला ‘ढुईका’ हा काव्यसंग्रह सप्रेम प्रदान केला. विशेष म्हणजे या काव्यसंग्रहाला डॉ. बागुल यांची प्रस्तावना लाभली आहे.
आज दिनांक २३ रोजी सकाळी १० वाजता डॉ. फुला बागुल यांच्या शिरपूर येथील निवासस्थानी हा छोटेखानी ऋणानुबंध सोहळा पार पडला. यावेळी शिरपूर पंचायत समितीचे माजी सदस्य तथा निमझरी येथील विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष छगन बापूजी पाटील यांच्या उपस्थितीत कवी रमेश पाटील यांनी ‘ढुईका’ काव्यसंग्रह डॉ. बागुल यांना प्रदान केला. यावेळी सौ. सरला ताई बागुल तसेच प्राथमिक शिक्षक विजय पाटील उपस्थित होते. साहित्यिक आणि कवी यांच्यातील जिव्हाळ्याचा ऋणानुबंध जपणारा हा छोटेखानी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे कवी रमेश पाटील यांनी आभार मानले.

No comments