adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगली लोकशाहीची पर्वणी; वर्ग व शाळा प्रतिनिधी निवडणूक उत्साहात संपन्न

  स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगली लोकशाहीची पर्वणी; वर्ग व शाळा प्रतिनिधी निवडणूक उत्साहात संपन्न  प्रा.सतीश गायकवाड...

 स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगली लोकशाहीची पर्वणी; वर्ग व शाळा प्रतिनिधी निवडणूक उत्साहात संपन्न 


प्रा.सतीश गायकवाड 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे वर्ग प्रतिनिधी व शाळा प्रतिनिधी निवडणूक २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव मिळावा या उद्देशाने संपूर्ण निवडणूक वास्तव मतदानाच्या धर्तीवर आयोजित करण्यात आली.

शाळेचे प्राचार्य श्री. व्ही. के. वडस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून नियोजन करण्यात आले. पर्यवेक्षक स्वप्निल सर, परीक्षा समिती प्रमुख सरदार तायडे सर, तसेच निवडणूक समितीचे सदस्य गणेश कोळी सर आणि अजय इंगळे सर यांनी संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध राबवली. निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून तुषार पाटील सर यांनी कामकाजावर देखरेख ठेवली. 


मतदान प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली. मतदानावेळी शाई लावणे, बॅलेट पेपर वाटप, मतदारांची नोंदणी आणि इतर सर्व निवडणूक कामकाज निवडणूक अधिकारी सतीश गायकवाड सर, सौ. राजश्री फेगडे-पाटील मॅडम, सौ. पूजा खाचणे मॅडम आणि सौ. रोहिणी पाटील मॅडम यांनी जबाबदारीने पार पाडले.

१४ ऑगस्ट २०२६ रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गांमधून वर्ग प्रतिनिधींची निवड करण्यात आली. शाळा प्रतिनिधीपदी मुलींमधून दर्शिता ओमप्रकाश सोनार, तर मुलांमधून आरुष विलास चौधरी यांनी विजयी होत विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला.

निवडणुकीनंतर शाळेच्या प्रांगणात डीजेच्या तालावर विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा करत नृत्य केले आणि आनंदोत्सवाने वातावरण भारावून गेले. प्राचार्य व्ही. के. वडस्कर सर यांनी नव्याने निवडून आलेल्या शाळा प्रतिनिधींचा टोपी व रुमाल देऊन सत्कार केला. 


कार्यक्रमाचे छायाचित्रण वैभव पाटील सर, तर ध्वनी व्यवस्थेची जबाबदारी अमोल सर यांनी सांभाळली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदान, मतमोजणी आणि लोकशाही प्रक्रियेचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले असून, शाळेने लोकशाही मूल्यांची प्रभावी रुजवात घडवून आणल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. 


No comments