adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला यावलमध्ये भव्य तिरंगा रॅली

 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला यावलमध्ये भव्य तिरंगा रॅली  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व...

 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला यावलमध्ये भव्य तिरंगा रॅली 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला यावल शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. नगरपालिका यावल, नगरपालिकेच्या संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तहसील कार्यालय यावल आणि पंचायत समिती कार्यालय यावल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी पीएम श्री साने गुरुजी विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई पाटील, शालेय समिती अध्यक्ष, विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अतुलदादा पाटील, नगरपालिका शिक्षण सभापती पराग सराफ, यावलच्या तहसीलदार सौ. मोहनमाला नाझरीकर, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी गायकवाड मॅडम, गटशिक्षणाधिकारी पठाण सर, विस्तार अधिकारी सरोज पाटील, नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक काळे साहेब, केंद्रप्रमुख शाकीर सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के. पाटील, उपप्राचार्य ए. एस. इंगळे, पर्यवेक्षक व्ही. ए. काटकर, पर्यवेक्षक व्ही. टी. नन्नवरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते तिरंगा रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. मोटारसायकल रॅलीमध्ये विविध शाळांतील शिक्षक, पंचायत समिती कर्मचारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

पीएम श्री साने गुरुजी विद्यालयाच्या बँड पथकाने रॅलीचे नेतृत्व केले. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

रॅलीची सुरुवात पीएम श्री साने गुरुजी विद्यालयापासून झाली. त्यानंतर नगरपालिका, दीपकजी बेहडे यांच्या दुकानाजवळून मेन रोड, बोरावल गेट मार्गे पुन्हा विद्यालयापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली.

या रॅलीमुळे यावल शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपालिका यावलचे कर्मचारी तसेच पीएम श्री साने गुरुजी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments