adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

  जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा   भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : येथील व्यास शिक्षण ...

 जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा 


 भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन मॅडम होत्या. तसेच इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या दिपाली धांडे मॅडम, शाळेच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे व गौरी भिरुड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्या रंजना महाजन यांच्या हस्ते आदिवासी स्वातंत्र्यसंग्रामातील महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेतील सहकारी शिक्षिका संध्या पांडव व रेशमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व, आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती व परंपरा तसेच बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता चौथी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी परिधान केलेली आदिवासी वेशभूषा. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका फेगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन हर्षाली बारी यांनी केले.

शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

No comments