सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्साहात 'जागतिक आदिवासी दिन' साजरा भरत कोळी यावल : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) य...
सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्साहात 'जागतिक आदिवासी दिन' साजरा
भरत कोळी यावल :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 'जागतिक आदिवासी दिन' अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात शाळेचे अध्यक्ष डॉ . प्रदीप माहेश्वरी सर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शीला तायडे मॅडम यांच्या हस्ते क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहत पुष्प अर्पण केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे व सादरीकरणाच्या माध्यमातून आदिवासी दिनाचे महत्त्व, आदिवासी संस्कृती, इतिहास आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान याविषयीची बहुमूल्य माहिती उपस्थितांसमोर मांडली.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी मार्गदर्शन करताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . शीला तायडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आदिवासी संस्कृतीचे जतन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांवर चालावे, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान आणि जाणिवा समृद्ध झाल्याचे पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

No comments