adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंभोरा येथील विद्यार्थिनींचा स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश

  निंभोरा येथील विद्यार्थिनींचा स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश  "स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवलेल्या निंभोरा कन्या शाळेतील विद्यार्थिनी व शि...

 निंभोरा येथील विद्यार्थिनींचा स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश 

"स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवलेल्या निंभोरा कन्या शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षकवृंद

रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील निंभोरा  जि.प. कन्या शाळा, निंभोरा येथील इयत्ता चौथीच्या ४ विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवत शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

यामध्ये भागवी अजय गिरडे हिने 242 गुण मिळवून बाजी मारली. तानिष्का राहुल मोरे 206 गुणांसह द्वितीय, गायश्री प्रमोद महाजन 178 गुणांसह तृतीय, तर अवसा फातिमा फिरोजखान 158 गुणांसह पात्र ठरली.

मुख्याध्यापिका पल्लवी राजाराम राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका मनिषा विनायक चौधरी व हेमलता ललित पाटील यांनी विद्यार्थिनींना परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख रागिणी प्रकाश लांडगे यांनीही मोलाचे सहकार्य केले.

या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. प्रियंका प्रदीप चिमणकारे, उपाध्यक्ष रफिक नुरा पिंजारीतसेच सर्व शिक्षक व पालकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शाळेत झालेल्या अभिनंदन समारंभात विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. या यशामुळे निंभोरा गावात आनंदाचे वातावरण आहे.

No comments