निमगव्हाण येथे 'स्वच्छ शाळा - सुंदर शाळा' अभियान उत्साहात संपन्न निमगव्हान ता. चोपडा (वार्ताहर) : अविनाश बाविस्कर (संपादक : हेमकांत...
निमगव्हाण येथे 'स्वच्छ शाळा - सुंदर शाळा' अभियान उत्साहात संपन्न
निमगव्हान ता. चोपडा (वार्ताहर) : अविनाश बाविस्कर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जि.प.उच्च प्राथमिक शाळा,निमगव्हाण येथे शासनाच्या निर्देशानुसार 'स्वच्छ शाळा - सुंदर शाळा' अभियान आज दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 8 वाजता राबविण्यात आले.
या अभियानात शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर, वर्ग खोल्या व शालेय आवाराची स्वच्छता केली. यावेळी ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शाळा स्वच्छ तर शिक्षण सुंदर,या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यापुढेही दर शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले.
यावेळी गावाचे प्रथम नागरिक दिनेश सपकाळे,शालेय समितीचे अध्यक्ष दीपक सैदाणे, मुख्यद्यापिका रेखा मराठे,प्रियंका निकम मॅडम,अविनाश बाविस्कर सर,खुशाल किराळे,प्रमोद बाविस्कर,आदी उपस्थित होते.

No comments