adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हातेड येथे शनिवार शाळा स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, आपली शाळा आपली जबाबदारी’चा संदेश; ग्रामस्थांसह शिक्षक व पदाधिकाऱ्यांचे श्रमदान

हातेड येथे शनिवार शाळा स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, आपली शाळा आपली जबाबदारी’चा संदेश; ग्रामस्थांसह शिक्षक व पद...

हातेड येथे शनिवार शाळा स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, आपली शाळा आपली जबाबदारी’चा संदेश; ग्रामस्थांसह शिक्षक व पदाधिकाऱ्यांचे श्रमदान 

शामसुंदर सोनवणे हातेड/चोपडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्या आवाहनानुसार श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा, हातेड येथे शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ‘शाळा स्वच्छता अभियान’ उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले. ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, आपली शाळा आपली जबाबदारी’ या घोषवाक्याने अभियानाची सुरुवात करण्यात आली.

संपूर्ण स्वच्छता अभियान तात्यासाहेब सुरेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी आदरणीय गजेंद्र दादा सोनवणे (माजी जि. प. सदस्य), केंद्रप्रमुख बाविस्कर दादा, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आदर्श ग्रामस्थ तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेत श्रमदान केले. 


या अभियानाला विशेष सहकार्य म्हणून सुनंदन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर सोनवणे  यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

अभियानांतर्गत शाळा परिसरातील कचरा, गवत व पालापाचोळा साफ करण्यात आला. तसेच झाडांची छाटणी, वर्गखोल्यांची स्वच्छता आणि संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात आली. स्वच्छतेदरम्यान जमा झालेला कचरा वाहून नेण्यासाठी तात्यासाहेब सुरेश सोनवणे यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून देत सहकार्य केले. 


शाळा ही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे केंद्र असून, शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, हा संदेश या अभियानातून देण्यात आला. ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि विविध पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे श्रमदान केल्याने शाळा परिसराचे रूप पालटले असून, परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न दिसू लागला आहे.

ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. 


No comments